जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमिकंडक्टरचं पावर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्र्यांनी सेमिकॉन इंडिया २०२४ चं ग्रेटर नोएडा इथं आज उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते.
सेमिकंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. या दशकाच्या शेवटापर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातली उलाढाल ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून यामुळे ६० लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकेकाळी मोबाईल आयात भारत आता भारत मोबाईल निर्मिती करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश बनल्याचंही त्यांनी सांगितलं.
सरकारनं डिजिटल इंडिया मोहिमेद्वारे सामान्य लोकांच्या हातात तंत्रज्ञान दिल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. सेमिकंडक्टर उद्योगाची वाढ झाल्याने यात आणखी वाढ होईल असं ते म्हणाले.
सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल नंबर आणि सव्वा २ लाखांहून अधिक मोबाइल हँडसेट दूरसंचार मंत्रालयाकडून निकामी
Site Admin | September 11, 2024 1:38 PM | Noida | PM Modi | SemiconIndia2024.