जम्मू-काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यातील एका दुर्गम गावात सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काल एक दहशतवादी मारला गेला. त्यामुळे या घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. आकाशवाणी जम्मू प्रतिनिधीनं दिलेल्या वृत्तानुसार, काल कथुआ जिल्ह्यातील बिलावर तहसीलमधील कोगमांडली इथं झालेल्या चकमकीच्या घटनास्थळी दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. गावात दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू आहे.
Site Admin | September 30, 2024 9:23 AM | J&K | security forces | Terrorist
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार
