दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावं असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे; त्याचं महत्त्व तसंच त्यामुळे होणाऱ्या लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 25, 2024 9:22 AM | marathi bhasha | Minister Uday Samant