फ्रान्समध्ये मध्यावधी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज होत आहे. विद्यमान संसदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी असतानाच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ९ जून रोजी संसद विसर्जित करून मद्यावधी निवडणुकांची घोषणा केली आहे.
पहिल्या टप्प्यात मरीन ले पेन यांच्या नॅशनल रॅली या उजव्या विचारसरणीच्या पक्षाला ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि नॅशनल रॅली पक्षाने जर स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २८९ जागा जिंकल्या, तर पक्षाचे नेते जॉर्डन बार्डेला यांची प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.