डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 21, 2025 7:20 PM | SEBI

printer

ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी सेबी एक नवी प्रणाली आणणार

शेअर बाजारातल्या ग्रे मार्केट ट्रेडिंगला आळा घालण्याच्या उद्देशाने सेबी एक नवी प्रणाली आणण्याची योजना आखत आहे अशी माहिती सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी आज दिली. असोसिएशन ऑफ इन्वेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

 

सेबीच्या या प्रणालीद्वारे शेअर गुंतवणूकदारांना आयपीओचं वाटप होताच त्यांना शेअर विकता येऊ शकतील. आयपीओ वाटपानंतर किंवा प्री-लिस्टिंग टप्प्यानंतर जर गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स विकायचे असतील तर त्यांना संधी देणं गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.

 

तसंच, आयपीओसाठी एक टेम्प्लेट विकसित करण्याच्या उद्देशाने सेबी काम करत असून आयपीओ संबंधित कागदपत्राचं पुनरावलोकन करण्यासाठी एआयचा वापर सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा