गुंतवणूक सल्ला देऊ इच्छिणारी कोणतीही व्यक्ती आयए रेग्युलेशन अर्थात गुंतवणूक सल्लागार नियमावली अंतर्गत पात्र आणि नोंदणीकृत असणं आवश्यक आहे, असं सेबीनं काल प्रकाशित केलेल्या प्रस्तावित नियम सुधारणा पत्रकात म्हटलं आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीची सुरक्षितता, दिलेल्या सल्ल्याची अचूकता याबाबतची जबाबदारी ही गुंतवणूक सल्लागाराची असते,मात्र सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गुंतवणूक सल्ला दिला जात आहे. गुंतवणूक सल्ल्याच्या व्याख्येत करण्यात आलेले महत्त्वाचे बदल, एखाद्या व्यक्तीची गुंतवणूक सल्लागार होण्यासाठीची पात्रता आणि वेबसाइटच्या देखभालीसंबंधीचे नियम प्रस्तावित दुरुस्तीमध्ये लागू करण्यात आले आहेत.
Site Admin | December 18, 2024 1:41 PM | SEBI