डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 12, 2024 3:23 PM | Hindenburg | SEBI

printer

हिंडेनबर्गने केलेले आरोप सेबीने फेटाळले

हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले आरोप सेबी म्हणजे भारतीय रोखे आणि विनिमय मंडळानं फेटाळले असून या पार्श्वभूमीवर शांत चित्ताने प्रतिक्रिया द्यावी,  असं आवाहन गुंतवणूकदारांना केलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चनं केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. हितसंबंधांमुळे निर्माण होणारे पेचप्रसंग हाताळण्यासाठी सेबीकडे पुरेसे नियम आणि सक्षम अंतर्गत यंत्रणा असल्याचं सेबीने म्हटलं आहे. वैयक्तिक मालकीचे समभाग, आणि इतर मुद्द्यांवर सेबी अध्यक्षांनी वेळोवेळी जाहीर खुलासे केले असून, हितसंबंधांचा पेच उद्भवेल अशा प्रकरणांमधून नेहमीच स्वतःला दूर ठेवलं आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आरोपांची सेबीने निःपक्षपाती आणि नियमानुसार  चौकशी केली असून देशाच्या भांडवली बाजारांची विश्वासार्हता आणि विकास याप्रति वचनबद्ध असल्याची ग्वाही सेबीने दिली आहे. 

दरम्यान, हिंडेनबर्गच्या आरोपांचा प्रतिवाद करताना सेबी अध्यक्ष माधवी पुरी- बुच यांनी अनेक बाबी स्वीकारल्या असून त्यामुळे त्यांच्याविषयी नवे प्रश्न निर्माण झाले असल्याचं ट्विट आज हिंडेनबर्गने केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा