भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजेच, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी काल भारतीय भांडवली बाजारात महत्वपूर्ण असलेल्या सर्वसमावेशक अहवालाचं अनावरण केलं. याबरोबरच, राष्ट्रीय रोखे बाजारातल्या असक्रिय निधीशी संबंधित असलेलं देशातलं पहिलं संकेतस्थळ त्यांनी कार्यान्वित केलं.
असक्रिय निधी संबंधित माहिती पारदर्शक आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ करणं हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. सशक्त बाजार तंत्र विकसित करण्याच्या मुद्द्यावर जोर देताना गुंतवणूकदारांना सुलभता आणि सुरक्षा प्रदान करणं हा उद्देश असल्याचं सेबीच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितलं.