डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

२२ जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

पुण्यासह राज्याच्या विविध भागातून नाहीसा झालेला मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून प्रामुख्यानं घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जूनच्या पहिल्या ८ दिवसात चांगल्या पद्धतीनं बरसलेला मोसमी पाऊस गेल्या आठवडाभरापासून नाहीसा झाला आहे. त्यामुळं शेतीची कामं देखील खोळंबलेली आहेत. राज्यातील अनेक मोठ्या धरणांनी तळ गाठला असून कोयना धरणातील वीज निर्मिती देखील बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी राज्यात अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ लागली असून २२ तारखेनंतर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा