डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नीट प्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पात्रता परीक्षा-नीट गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं १८ जुलैपर्यंत स्थगित केली आहे. दरम्यान, नीट-यूजी समुपदेशन प्रक्रिया चार फेऱ्यांमध्ये होईल. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात दिली. तसंच नीट यूजी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं आतापर्यंत झालेल्या तपासाचा अहवाल सीलबंद लिफाफ्यात न्यायालयासमोर सादर केला.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातला मुख्य आरोपी राकेश रंजन उर्फ रॉकी याला केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं अटक केली आहे. तर, या प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेला आरोपी एन.गंगाधरन याच्या कोठडीत काल न्यायालयानं चार दिवसांची वाढ केली. सीबीआय कोठडीत गंगाधरन याच्या मोबाईल मधून ‘नीट’ प्रकरणी तब्बल ६०० जणांसोबत संपर्क झाल्याची माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा