डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात 18 वर्षांखालील 98 लाख मुलांची तपासणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत राज्यातील 70 हजार शाळांमधील 18 वर्षे वयापर्यंतच्या 98 लाख मुलांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 164 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जन्मत: असलेलं व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळं होणारे आजार आणि इतर अपंगत्व इत्यादींचं वेळेवर निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचं उद्दिष्ट या कार्यक्रमात निश्चित केलं आहे. राज्यातील 18 वर्षांपर्यंतच्या साधारण 2 कोटी मुलांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. अंगणवाडी स्तरावर 6 वर्षांपर्यंतच्या मुलांची वर्षातून दोनदा होणारी आरोग्य तपासणी हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा घटक आहे, अशी माहिती पुणे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकंदर 1196 पथकं मंजूर करण्यात आली आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातल्या अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या 22 बालकांना मोफत शस्त्रक्रियेकरता काल सांगलीतून मुंबईतल्या विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आलं. या बालकांना मोफत प्रवास, निवास आणि भोजन व्यवस्था दिली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच अन्य संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून उपलब्ध अनुदानातून या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये गेल्यावर्षी डिसेंबरअखेर पुणे जिल्हा राज्यात अग्रस्थानी असून सांगली जिल्हा द्वितीय स्थानी आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा