डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2024 10:41 AM

printer

बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनाबद्दल‘स्कॉच’ पुरस्कार

बीड जिल्ह्यानं बाल विवाह निर्मूलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कारबीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आला. बीड जिल्ह्यात बाल विवाहाचं प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच हुंडा प्रथा, बाल लिंग गुणोत्तर, गरिबी, जुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत असं दीपा मुधोळ मुंडे यांनी यावेळी बोलतानासांगितलं.जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दर सोमवारी बालविवाह निर्मूलनविषयी प्रतिज्ञा घेतली जाते. 15 ऑगस्ट आणि2 ऑक्टोबर रोजी ग्राम सभेत बाल विवाह मुक्त ग्रामपंचायतीबाबत ठराव घेण्यात येत येतात. बीड जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये 132,2023 -24 मध्ये 255 बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आलंअशी माहिती त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा