पंढरपुरातील भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. या सांस्कृतिक भवनासाठी शासनाने 5 कोटी रुपये मंजूर केले असून आणखी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुलांसाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ‘ सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यास 6 हजार,पदविधारकांना 8 हजार आणि पदवीधरांना 10 हजार रुपये विद्यावेतन स्वरूपात मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.तत्पूर्वी ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रमादरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘ एक वारकरी एक झाड ’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा सर्वांनी संकल्प करूया, असं आवाहन शिंदे यांनी केलं.