राज्यसभेतल्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या ३, तर ओदिशा, पश्चिम बंगाल, आणि हरियाणातल्या एका जागेचा समावेश आहे. आंध्रप्रदेशातले खासदार वेंकटरमण राव मोपीदेवी, बीडा मस्तान राव यादव, आणि ऋयागा कृष्णय्या यांनी राजीनामे दिले. तसंच ओदिशातले सुजीतकुमार, पश्चिम बंगालमधले जवाहर सरकार आणि हरियाणातले कृषन लाल पंवार यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.
Site Admin | November 26, 2024 7:55 PM | by-election | Rajya Sabha
राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
