डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 8, 2024 7:17 PM | Scam

printer

राज्यपाल पदाचं आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक करणाऱ्याला अटक

कोणत्याही राज्याचं राज्यपालपद मिळवून देण्याचं आमिष दाखवून पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. निरंजन कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. निरंजन याने तामिळनाडूमधल्या एका व्यक्तिला आपली राजकीय वर्तुळात ओळख असल्याचं भासवत कोणत्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि त्यासाठी ५ कोटी ८ लाख रुपये घेतले होते. मात्र, निरंजन याने दिलेली कागदपत्रं खोटी असल्याचं आढळल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा