पेपर फुटी आणि गैरप्रकार या कारणांमुळं नीट – युजी २०२४ ही परीक्षा रद्द करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यंत्रणेतल्या त्रुटीमुळे पेपर फुटले असल्याचा कुठलाही पुरावा नाही. पुनर्परीक्षा घेतली तर २३ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होईल आणि शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत होईल, असं न्यायालयानं सांगितलं.
Site Admin | July 23, 2024 6:07 PM | NEET-UG 2024 | Supreme Court