सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुधारणा केली आहे. नव्या सुधारणेनुसार न्यायालयाचं कामकाज आता सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालेल. सार्वजनिक सुट्टी आणि महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी न्यायालयाचं कामकाज बंद राहील. १ ऑगस्टपासून नवे नियम लागू केले जाणार आहेत.
Site Admin | July 24, 2024 2:50 PM
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत सुधारणा
