क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी त्यांचं स्मारक उभं करण्यासाठी १० एकर जमीन तात्काळ अधिग्रहित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. ते आज सातारा जिल्ह्यात नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त ग्रामविकास विभाग आणि सातारा जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची द्विशताब्दी आणखी पाच वर्षांनी साजरी होणार आहे. त्यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानाला साजेशा भव्य स्मारकाचं काम पूर्ण करा. त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.