शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर आज ठाण्यातल्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळाने निधन झालं होतं. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. एक कुशल संघटक, प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक होता, असंही शिंदे यांनी प्रधान यांना आदरांजली वाहताना म्हटलं. ठाण्याचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर ते राज्यसभेत खासदार झाले. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी थिएटर हे प्रधान यांच्या ठाण्याला दिलेले योगदान आहे.
Site Admin | December 30, 2024 7:25 PM | Satish Pradhan
शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
