तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २४-२२,२३-२१ असा सरळ गेम मध्ये पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने ज्योकिम ओल्डरफ याला २१-१२, १९-२१, २१-११ असं नमवलं. दरम्यान, आकर्षि कश्यप, तानिया हेमंत, अनुपमा उपाध्याय या तीन महिला बॅडमिंटनपटू स्पर्धेतून बाद झाल्या.
Site Admin | September 4, 2024 1:58 PM | Badminton Tournament