कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा, प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार, यावेळी ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिकमध्ये गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण केलं जाणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत फाऊंडेशनचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, जनस्थान समितीचे अध्यक्ष विलास लोणारी, आणि ज्येष्ठ पत्रकार-लेखक कुमार केतकर, यांनी ही घोषणा केली.