डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 17, 2024 8:36 AM | Sathaye Collage

printer

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालयात प्राचीन काळातील दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग, प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय, भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्कृती, आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय पुरातत्त्व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे शिल्पकार डॉ. ह. धी. सांकालिया यांचा जन्मदिवस १० डिसेंबर रोजी असतो आणि याचे औचित्य साधून दिनांक १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), विलेपार्ले (पूर्व) येथे सकाळी ९:०० ते सायं. ६:०० या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.

 

प्राचीन काळातील अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू प्रदर्शनात पाहायला मिळतील. दहाव्या शतकाच्या काळातील अप्रतिम शिल्पे कलात्मक कौशल्याची साक्ष देतात. रामायण आणि महाभारताची हस्तलिखिते, तसेच जुन्या काळातील नाणी आणि शिलालेख सुद्धा इथे असतील. येथील प्राचीन भांडी आणि दुर्मिळ पुराजैवशास्त्रीय नमुने इतिहासातील वेगवेगळ्या पैलूंची कथा सांगतात. प्रत्येक वस्तूमध्ये प्राचीन जीवनाची एक झलक सामावलेली आहे. जी अभ्यासकांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांना आवडेल.

 

हे प्रदर्शन शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर मिलाफ आहे. प्राचीन इतिहासातील रंजक गोष्टी समजावून सांगत हे प्रदर्शन सर्व वयोगटांतील लोकांसाठी एक अद्भुत अनुभव देणारे असेल. हे प्रदर्शन हा एक विस्मयकारक सांस्कृतिक व बौद्धिक ठेवा आहे.

 

प्राचीन इतिहासाला जिवंत अनुभवण्याची इतिहास प्रेमींसाठी ही एक अप्रतिम संधी असेल

सर्वाधिक वाचले

सर्व पहा