डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतीच्या नुकसानाचे उपग्रहाव्दारे सर्वेक्षण करण्याची केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि पीक विम्याच्या रकमेत होणारी तफावत दूर करण्यासाठी आता उपग्रहाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळं नुकसानीचं अचूक मोजमाप होऊन त्यांना खरोखर अपेक्षित भरपाई मिळू शकेल, असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी विकास केंद्रात आयोजीत किसान संवाद मेळाव्यात बोलत होते.

 

शेतकरी अन्य राज्यात शेतमाल विकणार असेल, तर त्यासाठी वाहतूकीचा खर्च येईल तो खर्च केंद्र आणि राज्य शासनाने प्रत्येकी पन्नास टक्के करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. नाफेड सारख्या यंत्रणा कांदा खरेदी करत असताना काही गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर आता अशा अनेक पर्यायी यंत्रणा खरेदीसाठी उभ्या केल्या जातील, असं ते म्हणाले. शेतमालाच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी यंत्रणा उभारण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारांना केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा