सातारा जिल्हयात पाटण तालुक्यातल्या मान्याचीवाडी या राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या गावात महावितरणच्या वतीने शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना, मागेल त्यांना सौर कृषीपंप योजना, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी आणि घरगुती वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Site Admin | August 19, 2024 11:04 AM | CM Eknath Shinde | Satara
सातारा जिल्ह्यात राज्यातल्या पहिल्या सौरग्रामचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
