सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या बावधन मध्ये काल पारंपरिक बगाड यात्रा पार पडली. भैरवनाथाच्या जयघोषात हजारो भाविकांनी गुलाल उधळत बगाड रथ यात्रेत भाग घेतला. या यात्रेसाठी राज्यभरातून अनेक भाविक आले होते. दर वर्षी रंगपंचमीच्या दिवशी ही बगाड यात्रा होत असते. यावेळे भैरवनाथाला अनेक नवस बोलले जातात. तब्बल ४५ फूट उंचीच्या लाकडी बगाडवर मानाच्या बगाड्याला एका हुकने लटकवले जाते. यंदा बगाड्या होण्याचा मान अजित ननावरे यांना मिळाला होता.
Site Admin | March 20, 2025 3:01 PM | Satara
साताऱ्यात पारंपरिक बगाड यात्रेचा उत्साह
