भारताचे लोहपुरुष आणि आणि भारताच्या एकतेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांची १५० वी जयंती श्रीलंकेत कोलंबो इथंही साजरी केली गेली. यानिमित्तानं कोलंबोतल्या लिओनेल वेंडट आर्ट सेंटर इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि वारसा सांगणारं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. श्रीलंकेतले भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं आज उद्घाटन झालं. या प्रदर्शनात सरदार पटेल यांचा जीवनप्रवास मांडला आहे. हे प्रदर्शन उद्या संध्या ७ वाजेपर्यंत खुलं असणार आहे.
Site Admin | October 29, 2024 7:55 PM | Sardar Vallabhbhai Patel