डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 23, 2024 7:56 PM | Sarbananda Sonowal

printer

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी – केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल

भारताला आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पुढे नेण्यात मुंबईची भूमिका मोठी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय बंदरं, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत केलं. मुंबई बंदर प्राधिकरणाचे विविध प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रकल्प आणि सामंजस्य करार मुंबई बंदर प्राधिकरणाचं काम बदलत्या काळाच्या मागणीनुसार सुरू असल्याचं द्योतक आहे, असं सोनोवाल यांनी सांगितलं. 

पीर पाऊ इथं थर्ड केमिकल बर्थ, जवाहर द्वीप इथं किनारा संरक्षण आणि पुनर्प्राप्ती प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचं उद्घाटन सोनोवाल यांनी केलं. तसंच बंदरं आणि दळणवळणाच्या कामांमध्ये हरित इंधन प्रणाली विकसित करणं, उत्सर्जन व्यवस्थापन, कार्बन उत्सर्जन कमी करणं, डिजिटायजेशन इत्यादी विषयांवरचे सामंजस्य करार यावेळी झाले. त्यानंतर आजच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं मुंबई बंदरात उभ्या असलेल्या सर्व नौकांनी हॉर्न वाजवून सर्व अंतराळ संशोधकांचा सन्मान केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा