जेएनपीएच्या माध्यमातून वाढवण बंदराची उभारणी होत असून, प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज सांगितलं. त्यांनी आज जेएनपीएला भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाढवण बंदर हे देशातं सर्वोत्तम बंदर बनणार असून, कमीत कमी वेळेत या बंदराचं काम पूर्ण केलं जाईल, असं ते म्हणाले. जेएनपीए हे हरित बंदर केलं जाणार असून, तिथून अल्पावधीत एक कोटी कंटेनरची वाहतूक केली जाईल, असं सोनोवाल यांनी सांगितलं.
जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यात होणाऱ्या वाढवण बंदराचं भूमिपूजन येत्या ३० तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सोनोवाल यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा केला, आणि सिडको मैदानावर जाऊन भूमिपूजन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.