डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सरस्वती सन्मान पुरस्कार संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर

२०२४ या वर्षाचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रसिद्ध संस्कृत विद्वान महामहोपाध्याय साधु भद्रेशदास यांना जाहीर झाला आहे. ‘स्वामी नारायण सिद्धांत सुधा’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, १५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अर्जुन कुमार सिक्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं पुरस्कार विजेत्याची निवड केली आहे. नांदेडमध्ये १९६६ मध्ये जन्म झालेले भद्रेशदास हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संस्कृत तज्ञ आहेत. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण पंथाची दीक्षा त्यांनी घेतली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा