हैद्राबाद इथं सुरु असलेल्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत काल पश्चिम बंगालनं मागील उपविजेत्या सैन्यदल संघाचा ४-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैद्राबादच्या जीएमसी बालयोगी स्टेडियमवर काल रात्री हा सामना खेळवला गेला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात केरळनं मणिपूरचा ५ विरुद्ध १ गोलनं पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. संतोष चषक अंतिम सामना उद्या संध्याकाळी साडेसात वाजता हैद्राबाद इथं केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन संघांमध्ये होणार आहे. पश्चिम बंगालचा संघ ४७ व्या वेळा संतोष ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत असून त्यांनी आतापर्यंत ३२ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
Site Admin | December 30, 2024 2:51 PM | Football | Santosh Trophy