बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करत कराडला बाहेर काढावं लागलं.
Site Admin | January 15, 2025 6:47 PM | Beed Crime | Santosh Deshmukh Case