मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे. संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून याप्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती. आयोग राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असून सुरू असलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचं सोनावणे यांनी सांगितलं.
Site Admin | January 10, 2025 3:40 PM | Santosh Deshmukh Case