डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची सरकारची तयारी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यास सरकार अनुकूल आहे. यासंदर्भात निकम यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बातमीदारांशी बोलताना दिली.

 

आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणातल्या आरोपींना बीडच्या पोलिस कोठडीतून इतरत्र हलवण्याची मागणीही केल्याचं धस यांनी सांगितलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, हा खटलाच बीड जिल्ह्याऐवजी दुसऱ्या ठिकाणी चालवावा अशी मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज वार्ताहर परिषदेत बोलतांना त्यांनी ही मागणी केली. 

 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपल्या मंत्रिपदी राहण्यामुळे काहीही परिणाम होणार नसल्याचं, अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व आरोपींना फासावर चढवण्याची मागणी मुंडे यांनी केली. या प्रकरणात आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू असून तपासाला वेग आल्याचंही दिसत आहे, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा