डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज संस्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आज संस्थगित झालं. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या अधिवेशनात ११८ टक्के काम झालं असून १६ विधेयकं पारित  झाल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितलं. 

 

वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत १४ तास तर  राज्यसभेत १७ तास चर्चा झाल्याचं संसदीय कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितलं.  हे विधेयक सरकारने बळजबरीने पारीत करून घेतल्याचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी  यांचा आरोप रिजिजू यांनी फेटाळून लावला. सभापती ओम बिर्ला यांनीही हे विधान दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. 

 

त्याआधी अमेरिकेने भारतावर लादलेल्या शुल्कावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. सभागृहाचं आजचं कामकाज सुरू होताच काँग्रेस आणि द्रमुकच्या खासदारांनी या मुद्दयावरून घोषणाबाजी सुरू केली तसंच काही सदस्य  हौद्यात उतरले होते. दुसऱ्या बाजूला वक्फ सुधारणा विधेयक हा संविधानावरील हल्ला असल्याच्या सोनिया गांधी यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी  खासदारांनी घोषणाबाजी केली आणि गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. 

 

राज्यसभेचं आजचं कामकाज सुरू झालं तेव्हा पश्चिम बंगालमधल्या शिक्षक भरतीवरून सत्ताधीर खासदारांनी गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेच्या अध्यक्षांनी दुपारी बारा वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कामकाज  दुपारी एक वाजेपर्यंत  तहकूब करण्यात आलं होतं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा