संसदेत आणि राज्य विधिमंडळांमध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांचा कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली. १५ व्या महाराष्ट्र विधिमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते.
कामकाजात जाणूनबुजून आणला जाणारा व्यत्यय संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं. विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली.