मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळं देशातल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. माहितीपट हा एक प्रचंड मोठा उद्योग आहे. माहितीपटांच्या माध्यमातून मनोरंजनासह स्वतःकडे आणि समाजाकडे पाहता येतं, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज केलं. या महोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत ते मुंबईत बोलत होते. या महोत्सवामुळं कलेच्या प्रसारासोबतच समाजातले विविध मुद्दे सर्वांसमोर येतील आणि त्यावर पर्याय काढायला यामुळं मदत होईल, असंही ते म्हणाले. यंदाच्या महोत्सवातून चित्रपट आणि लघुपटांशिवाय डॉक बाजारही अनेक चित्रपट दिग्दर्शकांना त्यांचं काम दाखवण्याची संधी उपलब्ध करुन देईल, अशी माहिती जाजू यांनी दिली. या वेळी महोत्सवाचे संचालक प्रिथुल कुमारही उपस्थित होते.
Site Admin | June 14, 2024 7:36 PM | चित्रपट | मिफ | संजय जाजू