प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत वैयक्तिक घटकांमध्ये २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्ह्यात एकूण ५३८ लाभार्थ्यांच्या प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली आहे.
सध्या सांगली जिल्हा ही योजना राबवण्यात देशात द्वितीय स्थानी आणि राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे नोडल अधिकारी धनाजी पाटील यांनी ही माहिती दिली.