भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाशी इथं पक्षाच्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.
Site Admin | October 22, 2024 3:43 PM | Sandeep Naik
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी
