भंडारा जिल्ह्यात वाळूतस्करीविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ५८३ आरोपींविरुद्ध २८६ वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसंच वाळू आणि वाहनांसह ४८ कोटी ४४ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या वैनगंगा, चुलबंद, बावणथडी आणि सूर या नद्यांमधली वाळू दर्जेदार असल्यानं विदर्भाबाहेर आणि लगतच्या राज्यातही तिला मोठी मागणी आहे.
Site Admin | December 13, 2024 4:00 PM