शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अकोला जिल्ह्यातल्या १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या असून शाळा स्तरावर या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. अलीकडच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या स्थापन करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित १ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
Site Admin | September 10, 2024 3:26 PM | Akola | Sakhi Savitri Samiti | Schools