संत गाडगेबाबा यांची जयंती आज राज्यभरात साजरी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी झाली. नाशिकच्या पोलीस उपायुक्त पद्मजा बढे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.