डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सैद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

सिंधूने चीनच्या दाई वांगचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मिराबा लुवांग मासनमचा २१-८, २१-१९ असा पराभव केला.

महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा