डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आठ पट्टेरी वाघांची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातल्या जंगलात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गणनेमध्ये आठ पट्टेरी वाघांची नोंद झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.  गेल्या अनेक वर्षांत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने वाघांची नोंद झाल्यामुळे वनविभागाने वन्यजीव संरक्षणासाठी केलेल्या कामाची पावती मिळाली आहे. 

 

आसपासच्या गावात गुरांवर वाघांनी हल्ले केल्याच्या तक्रारी आल्यामुळे वनविभागाने कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वाघांचा शोध घेतला तेव्हा ३ नर आणि ५ माद्यांचा वावर असल्याचं आढळून आलं. वाघांचा वावर वाढल्यामुळे पर्यटनाच्या संधी वाढल्या आहेत. त्याबरोबरच वनविभागाने आधुनिक ट्रॅप कॅमेरे आणि गस्त सुरु ठेवल्यामुळे वन्यजीवांचा स्थानिक वावर अधिक सुरक्षित होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा