डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशात लवकरच सहकारी तत्त्वावर टॅक्सी उपक्रम

केंद्र सरकार ओला-उबर यासारख्या व्यावसायिक सेवांच्या धर्तीवर सहकार टॅक्सी हा सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केली. लोकसभेततील एका चर्चेत बोलताना शहा यांनी हा उपक्रम सहकार से समृद्धी या धोरणाशी सुसंगत असल्याचं सांगितलं.

 

या उपक्रमांतर्गत अत्यंत मोठ्या स्वरुपात सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असून त्याअंतर्गत दुचाकी, टॅक्सी, रिक्षा आणि चारचाकी गाड्यांची नोंदणी करता येऊ शकेल आणि त्याचा नफा थेट चालकाला मिळेल, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा