साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा आज झाली. मराठी विभागातून सुदर्शन आठवले यांना ‘द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचं याच नावाने भाषांतर केल्याबद्दल यंदा हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर मिलिंद म्हामल यांना ‘भारतीय तत्वज्ञानाची रूपरेषा’ या नावाने ‘आऊटलाइन ऑफ इंडियन फिलॉसॉफी’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचं कोकणीत भाषांतर केल्याबद्दल साहित्य अकादमीच्या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. याशिवाय इतरही विविध भाषांमध्ये हे पुरस्कार साहित्य अकादमीनं आज जाहीर केले आहेत.
Site Admin | March 7, 2025 7:28 PM | Sahitya Akademi Award
साहित्य अकादमीच्या भाषांतरासाठीच्या वर्ष २०२४च्या पुरस्कारांची घोषणा
