ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदांचे गद्य रूप’ या पुस्तकासाठी रसाळ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमी ने २१ भाषांमधल्या यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं आज जाहीर केली. त्यात ८ कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, २ लघुकथा, ३ ललितलेख, ३ साहित्य समीक्षा, एक नाटक आणि एका संशोधनात्मक साहित्यकृतींचा समावेश आहे. आकाशवाणी पणजी केंद्रातले वृत्तनिवेदक मुकेश थळीं यांच्या ‘रंगतरंग’ या कोकणी ललितलेख संग्रहालाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
एक लाख रुपये रोख, ताम्रपट, आणि` शाल या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या ८ मार्चला दिल्लीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल.