डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवं- नितीन गडकरी

देशात होणारे रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रस्ते बांधताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं इंडियन रोड काँग्रेसच्या ८३ व्या वार्षिक अधिवेशनाचं काल संध्याकाळी उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. रस्ते अभियांत्रिकी आणि ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील त्रुटी सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं ते म्हणाले. रस्ते प्रकल्पांच्या संपूर्ण अहवालाची काळजीपूर्वक तपासणी केल्याशिवाय कोणतीही निविदा जारी करू नये अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
चार दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात दोन हजारांहून अधिक शास्त्रज्ञ, अभियंते आणि अधिकारी सहभागी झाले आहेत. या अधिवेशनादरम्यान रस्ते बांधणी आणि रस्ता सुरक्षा या विषयांवर चर्चा होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा