आत्मपरीक्षण आणि जागरूकता हे दोन महत्वाचे गुण आहेत. त्याआधारे विद्यार्थी आपल्या विचारसरणीत स्पष्टता आणि लवचिकता आणून ध्येयपूर्तीचा मार्ग निश्चित करू शकतात, असं प्रख्यात आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या ‘मनःशक्तीचे सामर्थ्य’ या पाचव्या भागात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
शैक्षणिक क्षेत्रातल्या यशापेक्षाही आंतरिक वाढ महत्वाची असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्ञानार्जन हसतखेळत असावं आणि संतुलित आणि चैतन्यशील मनाने शिक्षण घ्यावं, शिक्षण हे केवळ परीक्षांसाठी नाही हे समजून बुद्धीला कायम गतिशील ठेवावं, असा सल्ला त्यांनी दिला.