पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ ४६ प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं, अशी एकूण २१ पदकं जिंकली आहेत.
दरम्यान, महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत अमिषा रावत ही १५व्या स्थानावर राहिली. नेमबाजीत रुद्रांश खंडेलवाल आणि निहाल सिंग हे मिश्र ५० मीटर पिस्तुल एसएच १ प्रकारात पात्र ठरू शकले नाहीत. पॅरा टेबल टेनिस डब्ल्यू एस ४ प्रकारात उपांत्य फेरीत भारताची भाविना पाटील ही चीनच्या झोऊ यिंगकडून पराभूत झाली. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात परमजीतला आठवं स्थान मिळवता आलं.