डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 3, 2024 7:04 PM | ST Bus | Strike

printer

ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सेवा सुविधा मिळाव्यात, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, तसंच इतर सुविधाही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच असाव्यात ही त्यांची प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं राज्य सरकारला निवेदन देऊन सुद्धा त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही, राज्य सरकार विविध लोकोपयोगी योजनांची घोषणा करत असतांना आमच्या मागण्या आणि वेतन वाढीकडेही सरकार सातत्यानं दुर्लक्ष करत आहे, या संदर्भात एक महिन्यापूर्वी नोटीस देऊनही सरकारनं दखल घेतली नाही, त्यामुळे हा बेमुदत संप सुरु केला असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. 

 

एसटी कामगारांच्या सर्व संघटना यात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. मात्र यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचं आमच्या ठीकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. 

 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्या बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढू, कर्मचाऱ्यांनी संप करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.  

 

सरकार आणि कर्मचारी संघटनांमधली बैठक निष्फळ ठरली. गणेशोत्सवाच्या काळात संप करु नका, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा